December 8, 2025 7:16 PM December 8, 2025 7:16 PM

views 1

आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुणे विद्यापीठ प्रथम

नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तर उपविजेतेपद मुंबई विद्यपीठानं पटकावलं. स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या संघाला मिळालं.    या स्पर्धेत खो -खो, बुद्धिबळ, कब्बडी, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा विविध क्रीडाप्रकारांचे सामने झाले.