November 24, 2025 7:04 PM
51
माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल
माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.युद्धनौकेच्या दाखल झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी...