August 19, 2024 1:39 PM August 19, 2024 1:39 PM

views 12

नौदल संबंध मजबूत करण्यासाठी आयएनएस तबर डेन्मार्कमध्ये दाखल

भारतीय नौदलाची INS तबर ही प्रमुख युद्धनौका दोन दिवसांच्या भेटीसाठी डेन्मार्कच्या एस्जबर्ग येथे दाखल झाली आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्या नौदलांदरम्यान असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा आयएनएस तबरच्या या भेटीचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. INS तबर बंदरात असताना या नौकेवरील कर्मचारी डेन्मार्कच्या सैन्य दलासोबत आयोजित करण्यात आलेल्या विविध द्विपक्षीय व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे, यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश आहे.