December 20, 2024 2:44 PM December 20, 2024 2:44 PM

views 18

परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही. या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, असंही त्यांनी नमूद केलं. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.   तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेल...