December 7, 2025 1:26 PM December 7, 2025 1:26 PM

views 11

१२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीमा रस्ते संघटनेच्या वतीनं उभारल्या जात असलेल्या, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. हे प्रकल्प ७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जात आहेत.   हे पायाभूत सुविधा प्रकल्प देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय लष्कर आणि सीमा रस्ते संघटनेच्या जवानांच्या स्मृतींना समर्पित असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत लेह मधील श्योक बोगद्याचाही समावेश आहे. या बोगद्यामुळे लडाखमध्ये कडाक्याच्या...