October 26, 2025 8:18 PM October 26, 2025 8:18 PM

views 144

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला.    या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.

September 29, 2024 4:09 PM September 29, 2024 4:09 PM

views 2

भारत आणि बांग्लादेशात दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

भारत आणि बांग्लादेशात कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर, पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांग्लादेशानं ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून १-० नं आघाडीवर आहे.

September 20, 2024 2:04 PM September 20, 2024 2:04 PM

views 11

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यामधल्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात  ३७६ धावा झाल्या. सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३९ धावांवर डाव सुरु केला आणि ३७ धावात भारताचे उरलेले चार फलंदाज बाद झाले. आर. अश्विन यांनं ११३ धावा केल्या.    बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. अवघ्या ४० धावात त्यांचे ५ गडी तंबूत परतले होते. अश्विननं त्यांचे २ बळी टिपले. शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या ५ गडी बाद ९० धावा झाल्या होत्या