January 24, 2026 6:16 PM

इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रान्तात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू तर सुमारे ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. या भागात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली आहे.  

November 15, 2025 7:57 PM

views 17

इंडोनेशियाच्या जावा परगण्यात पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा ११ वर

इंडोनेशियाच्या जावा परगण्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. यात अन्य १२ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. कीलकॅप इथं तीन गावांमध्ये पसरलेल्या घरांवर दरड कोसळल्यानं हा अपघात झाला. सप्टेंबर पासून सुरु झालेला ओला दुष्काळ एप्रिल पर्यंत कायम राहण्याची शक्यता इंडोनेशियाच्या हवामान विभागानं वर्तवली असून यामुळे अती मुसळधार पाऊस आणि पुराचं धोका संभवत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.