October 20, 2024 1:37 PM October 20, 2024 1:37 PM

views 14

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला आहे. इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून ७३ वर्षांचे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती बनले आहेत. विशेष दलांचे माजी कमांडर असलेल्या प्राबोवो सुबियांतो यांना १४ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत जवळपास ६० टक्के मतं मिळाली.