January 1, 2025 9:45 AM

views 10

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्त्वाची – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांचं मत

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. तात्कालिक आपत्तीला प्रतिसाद देण्यातून निर्माण झालेला क्वाड समूह आता पूर्णवेळ भागीदारीत परिवर्तित झाला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. क्वाड समूह आता एकमेकांसोबतच हिंद प्रशांत क्षेत्रात...

November 17, 2024 5:22 PM

views 10

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका वचनबद्ध

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने आज स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियामधल्या डार्विन इथं ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्ल्स, जपानचे संरक्षण मंत्री नाकातनी जेन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सागरी निगराणीतील भारताच्या नेतृत्वाचंही तिन्ही मंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं.