December 15, 2025 1:45 PM

views 37

इंडिगो विमानसेवांमध्ये अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

इंडिगोच्या विमानसेवांमध्ये निर्माण झालेल्या अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू असल्याची नोंद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठानं घेतली आणि याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयातल्या सुनावणीत सहभागी व्हायची मुभा दिली.

December 7, 2025 1:22 PM

views 40

मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून इंडिगोची २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत. मात्र,  लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोने आपल्या निवेदनात दिलं आहे.    इंडिगो विमान कंपनीने आपल्या रद्द केलेल्या किंवा व्यत्यय आलेल्या विमानांमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रवाशांचे पैसे आज रात्री आठ वाजेपर्यंत परत करावेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत. ...

December 6, 2025 8:25 PM

views 57

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश

इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रलंबित प्रक्रिया उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत.   (विमानाची वेळ बदलण्यासाठी प्रवाशांकडून कुठलेही शुल्क आकारु नका. त्याचप्रमाणे प्रवाशांचं साहित्य नियोजित पत्त्यावर पुढल्या ४८ तासांत पोहोचवा असे निर्देशही सरकारनं इंडिगोला दिले आहेत. त्यावर ग्राहकांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याचं काम प्राधान्याने केलं जात असल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. आज रद्द हो...

December 6, 2025 11:39 AM

views 35

विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चार सदस्यीय समिती

इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन आज परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत विमानसेवा पूर्वपदावर येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयांचे आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. विमान सेवा कालमर्यादेचा आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं तात्काळ प्रभावानं स्थगित केला आहे. हवाई सुरक्षेशी कोणती...

December 6, 2025 1:35 PM

views 54

इंडिगोची ४०० हून अधिक उड्डाणं रद्द

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारीसुद्धा इंडिगोची ४०० हुन अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापैकी बंगळुरू विमानतळावर १२४, मुंबई विमानतळावर १०९ तर पुणे विमानतळावरच्या ४२ विमानसेवा आज रद्द झाल्या आहेत. मात्र, विमानउड्डाणांच्या वेळांमधली दिरंगाई तसंच विमानं रद्द होणं आटोक्यात आलं असून विमानतळांवर आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते...