December 10, 2025 9:25 AM
38
इंडिगोच्या कंपनीच्या विमान उड्डाणातील संख्येत 10% कपात
इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना काल पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं. 6 डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची, तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची ...