December 11, 2025 3:55 PM December 11, 2025 3:55 PM

views 23

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचं प्रवासाचं कुपन देणार

विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचे प्रवासाचे कूपन देणार आहे. या कुपनचा वापर वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी करता येईल. ३ ते ५ डिसेंबरच्या दरम्यान उड्डाण रद्द झालेल्या, विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कूपन दिली जातील, असं कंपनीनं पत्रक काढून स्पष्ट केलंय.    याशिवाय उड्डाणाला २४ तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना ५ ते १० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

December 11, 2025 9:50 AM December 11, 2025 9:50 AM

views 14

इंडिगोच्या गुरूग्राम कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथकाची स्थापना

गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानाच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरूग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केले आहे. महासंचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, विमान विलंब, उड्डाणे रद्द होणे यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्देश यामागे आहे.   उपमुख्य उड्डाण संचालन निरीक्षक कॅप्टन विक्रम शर्मा, यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्याचं पथक विमान संख्या, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, कामाचे तास, अनियोजित सुट्य...

December 9, 2025 8:26 PM December 9, 2025 8:26 PM

views 63

१०% विमान उड्डाणं कमी करण्याचा केंद्र सरकारचा इंडिगो कंपनीला आदेश

इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत १० टक्के कपात करायचे आदेश दिल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना आज पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं. ६ डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल...

December 9, 2025 1:36 PM December 9, 2025 1:36 PM

views 85

इंडिगो कंपनीने नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपात करावी असे डीजीसीए चे निर्देश

इंडिगो कंपनीची विमानउड्डाणं रद्द झाल्यानं ३ तारखेपासून नागरी हवाईसेवेत झालेल्या खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडीगो विमान कंपनीला त्यांच्या वेळापत्रकात विमान उड्डाणांमध्ये पाच टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः अधिक मागणी आणि अधिक वारंवारता असलेल्या उड्डाणांसाठी हे निर्बंध लागू होतील असं संचालनालयानं म्हटलं आहे. हवाई वाहतुकीसंबधित विभागानं कंपनीला उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक दाखल करायला सांगितलं आहे.    देशातल्या विमानउड्डाणा...

December 6, 2025 1:35 PM December 6, 2025 1:35 PM

views 40

इंडिगोची ४०० हून अधिक उड्डाणं रद्द

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारीसुद्धा इंडिगोची ४०० हुन अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापैकी बंगळुरू विमानतळावर १२४, मुंबई विमानतळावर १०९ तर पुणे विमानतळावरच्या ४२ विमानसेवा आज रद्द झाल्या आहेत. मात्र, विमानउड्डाणांच्या वेळांमधली दिरंगाई तसंच विमानं रद्द होणं आटोक्यात आलं असून विमानतळांवर आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते...

December 4, 2025 8:11 PM December 4, 2025 8:11 PM

views 16

इंडिगो कंपनीची ३०० विमान उड्डाणं रद्द

इंडिगो कंपनीची सुमारे ३०० विमान उ़ड्डाणं आज रद्द झाली आणि इतर अनेक विलंबानं उड्डाण करत होत्या. काल कंपनीची २० टक्क्यांहून कमी विमान वेळेवर उडाली होती. परिस्थिती नियमित करण्यासाठी आणि उड्डाण वेळेत करण्याचं कठीण उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर यांनी कळवलं आहे.

May 13, 2025 1:16 PM May 13, 2025 1:16 PM

views 10

एअर इंडिया आणि इंडिगोच्या काही विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत. दिल्ली विमानतळावरून नियमित उड्डाणं होत आहेत. मात्र, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाने अनिवार्य केलेल्या वाढीव सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो, असं या विमान कंपन्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वेळापत्रकांवरच्या परिणामामुळे चेक-इन प्रक्...