September 28, 2024 12:49 PM September 28, 2024 12:49 PM
11
भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर – मंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा
भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा यांनी दिली आहे. खनिज, धातू, धातूशास्त्र परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. पोलाद उद्योगातली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषाचं वर्मा यांनी कौतुक केलं. यामुळे पोलाद निर्मितीची क्षमता वाढल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४४ अब्ज टन पोलाद निर्मिती केल्याची माहिती वर्मा यांनी दिली.