February 18, 2025 1:20 PM February 18, 2025 1:20 PM

views 15

भारताच्या निर्यातीत ७.२१ टक्के वाढ

२०२४-२५ या आर्थिक वर्षात त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत ७ पूर्णांक २१ शतांश टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ८ पूर्णांक ९६शतांश  टक्के वाढ नोंदवली गेली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.  या कालावधीत एकंदर निर्यात सुमारे ६८३ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे तर आयात एकंदर ७७० अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान व्यापारी मालाची निर्यात ३५९ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक...

October 17, 2024 1:37 PM October 17, 2024 1:37 PM

views 8

भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत 393अब्ज 22 कोटी डॉलरवर

भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत चार पूर्णांक ८६ शतांश टक्क्यांनी वाढून ३९३ अब्ज २२ कोटी डॉलरवर पोचली आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत ती ३७५ अब्ज डॉलर इतकी होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या सहामाहीत व्यापारी मालाची निर्यात १ पूर्णांक २ शतांश टक्क्यांनी वाढून २१३ अब्ज २२ कोटी डॉलरवर पोचली आहे, तर सेवा क्षेत्रातली निर्यात ९ पूर्णांक ८१ दशांश टक्क्यांनी वाढली आहे.     यंदा सप्टेंबर महिन्यातच निर्यातीत तीन पूर्णांक ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे....

July 16, 2024 2:59 PM July 16, 2024 2:59 PM

views 11

वस्तू आणि सेवा निर्यातीत ५ पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ

 देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढून ६५ अब्ज ४७ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात ८ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांनी वाढून २०० अब्ज ३३ कोटी डॉलरवर पोहोचली आहे.   गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात व्यापारी निर्यातीत वाढ झाली. २०२४ च्या एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत व्यापारी निर्यात १०९ अब्ज ९६ कोटी ...