January 17, 2025 10:22 AM January 17, 2025 10:22 AM
4
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्यातीत 35.11टक्क्यांची वाढ
भारताचं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात 35 पुर्णांक 11 टक्क्यांनी वाढून दोन वर्षांत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 2 पुर्णांक 65 अब्ज डॉलर्स असलेली निर्यात वाढून यावर्षी साडेतीन अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली आहे. भारतात उत्पादित झालेल्या घरगुती वापराच्या वस्तू आणि उच्च मूल्याच्या भारतीय वस्तूंच्या परदेशी मागणीत वाढ झाल्याचं वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर कालावधीत देशाची इलेक्ट्रॉनिक निर्या...