June 10, 2025 1:35 PM June 10, 2025 1:35 PM

views 10

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

April 17, 2025 2:43 PM April 17, 2025 2:43 PM

views 9

भारताचे संरक्षण क्षेत्र स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे: संरक्षण मंत्री

भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमताही वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. मोदी सरकारने सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे, असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत लष्करी क्षेत्रातली तांत्रिक प्रगती, धोरणा...