November 11, 2024 1:32 PM November 11, 2024 1:32 PM

views 8

भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेचं विजेतेपद

भारताच्या अनाहत सिंगनं सिडनी इथं सुरू असलेल्या स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. तीचं हे वर्षातील सातवं पीएसए चॅलेंजर विजेतेपद आहे. अंतिम फेरीत सिंगनं हाँगकाँगच्या १५ वर्षीय हेलन तांगचा ३-१ असा पराभव केला.