December 20, 2024 6:18 PM December 20, 2024 6:18 PM
233
वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका भारतीय महिला संघानं जिंकली
महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली. भारतानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारताकडून राधा यादव हिने चार गडी बाद केले. ऋचा घोषने महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकारात आजवर सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तिने अवघ्या १८ चेंडुंत ५० धावा केल्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर...