August 17, 2024 10:25 AM August 17, 2024 10:25 AM

views 11

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार असल्याचं, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सावे यांच्या हस्ते इतर मागास वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या वसतीगृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या वसतीगृहात ज्यांना प्रवेश मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले आधार योजना आणि...

July 25, 2024 8:41 PM July 25, 2024 8:41 PM

views 17

बांगलादेशातून आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशातून आतापर्यंत ६ हजार ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी भारतात परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ढाकामधल्या भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था भारत बांग्लादेश सीमेपर्यंत तसंच विमानतळापर्यंत केली आहे, विद्यार्थ्यासाठी चोवीस तास संपर्क यंत्रणा कार्यरत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.