June 21, 2024 1:20 PM

views 23

जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर ८ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं काल जम्मू काश्मिरमधल्या जगातील सर्वात उंचीवरच्या चिनाब पुलावर आठ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मिरमधील राईसी ते बारामुल्ला दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामबान जिल्ह्यातल्या संगलदान पासून ते रईसी दरम्यान ४६ किलोमिटर विद्युतीकरण झालेल्या मार्गावर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. या मार्गावरुन ४० किलोमिटर प्रतीतास वेगानं गाडी चालवण्यात आली. या पुलावरुन पहिल्यांदाच पूर्ण रेल्वेगाडी चालवण...

June 16, 2024 3:33 PM

views 26

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेने गेल्या २६ फेब्रुवारीला विविध दोन हजार ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यात ४० लाख १९ हजार लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, रेल्वे पादचारी पुलांचं उद्घाटन तसंच नव्या रेल्वेस्थानकांची पायाभरणी करण्यात आली होती.