August 9, 2025 2:47 PM

views 12

राउंड ट्रिप पॅकेज योजना लागू करण्याचा रेल्वेचा निर्णय

भारतीय रेल्वेने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकिट दरात २० टक्के सूट दिली जाईल.     दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सूट लागू होईल, तसंच या तिकिटावर संबंधित प्रवाशा व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही, असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजने अंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही.

July 11, 2025 3:00 PM

views 23

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करणार

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करत आहे. ही निरीक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली चालत्या रेल्वे गाड्यांच्या फोटोवरुन अनियमितता असलेल्या सुट्या भागांची माहिती दुरुस्ती यंत्रणांना देते. यामुळं संभाव्य अपघात टाळण्यात मदत होईल.

June 12, 2025 11:57 AM

views 13

6 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे रेल्वे प्रकल्प केंद्राकडून मंजूर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पीय समितीनं ६ हजार ४०५ कोटी रुपयांच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या नवीन मार्गामुळे संपर्क, वाणिज्य आणि शाश्वतता यामध्ये सुधारणा होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. या मार्गांच्या बांधकामांदरम्यान 108 लाख मानव-दिवसांची थेट रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.   या प्रकल्पांमध्ये कोडेरमा - बारकाकाना डबलिंग आणि बल्लारी - चिकजजूर डबलिंग रेल्वे मार्गाचा समावेश आहे. हा प्रकल्प झारखंडच्या एक प्रमुख कोळसा उत्पादन क्षेत्रातून जात...

April 2, 2025 3:36 PM

views 24

येत्या दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे कॅमेरे बसवले जातील -रेल्वेमंत्री

भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरु आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. प्रत्येक रेल्वे विभागात, परिमंडळात आणि रेल्वे मंडळात वॉर रूम स्थापन केल्या असून त्यांवर नियमित देखभाल केली जात आहे. रेल्वे संरक्षण दलात एकूण मनुष्यबळापैकी ९ पूर्णांक ४ दशांश टक्के महिला कार्यरत असल्याचं त्यांची सांगितलं.

February 18, 2025 3:03 PM

views 20

गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी उपाययोजना

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन देशभरातील ६० रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरळीत वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व दिल्ली रेल्वे स्थानकांवर एक विशेष मोहीम सुरू केली जाईल. अशी माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय माध्यमांशी बोलताना दिली.

February 17, 2025 9:50 AM

views 24

महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महाकुंभ मेळयासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणि अतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काल 4 विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या दुपारी 3 ते रात्री 9 दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत .   दरम्यान, काल महाकुंभ मेळयात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1 कोटी 36 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केल 13 जानेवारीपासून कालपर्यंत 52 कोटी 83 लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे.  

January 28, 2025 3:01 PM

views 16

भारतीय रेल्वेने १३० किमी प्रति तास वेग वाढवण्यासाठी २३,००० किमी मार्गिका केल्या अद्ययावत

भारतीय रेल्वेने २३ हजार किलोमीटरच्या मार्गिका अद्ययावत केल्या असून यामुळे रेल्वे १३० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्यासाठी मदत होणार आहे. तसंच ११० किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावू शकणाऱ्या ५४ हजार किलोमीटर मार्गिकाही अद्ययावत केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. यामुळे विविध प्रदेश रेल्वेने जोडले जाणार असून रेल्वेची कार्यक्षमता वाढणार आहे. वेग वाढवण्यासाठी मार्गिकांचं अद्ययावतीकरण, प्रगत सिग्नल यंत्रणा, आणि धोका टाळण्यासाठी कुंपण बसवून रेल्वे मार्गिकांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं ...

January 5, 2025 1:58 PM

views 16

महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे १३,००० गाड्या सोडणार

उत्तर प्रदेशात प्रगायराज इथं होणार असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. यात १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते ती अतिरिक्त दिवस असे मिळून ५० दिवस या गाड्या चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं भाविक आणि यात्रेकरू येण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी टाळण्यासाठी लोकांची वर्दळ एकमार्गी ठेवण्याचं नियोजन केलं असल्याचंही रेल्व...

November 27, 2024 6:25 PM

views 13

भारतीय रेल्वेचं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा उत्पादन खर्च प्रति डब्बा सुमारे २८ कोटी रुपये आहे. दुसऱ्या एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा वेग कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

November 17, 2024 10:36 AM

views 28

‘मिशन झिरो डेथ’ द्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे रुळांवरील मृत्यूदरात घट

‘मिशन झिरो डेथ’चा एक भाग म्हणून रेल्वे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे, अत्यंत प्रभावी परिणाम दिसत आहेत. मध्य रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत रेल्वे रुळावरील मृत्युंची संख्या 14 टक्क्यांनी घटली आहे तर जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या 10 टक्क्यांनी घटली आहे. अतिक्रमण हे या घटनांचं एक प्रमुख कारण आहे असं या प्रकरणांचं बारकाईनं विश्लेषण केल्यावर दिसून आलं असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. या कालावधीत एकंदर 3 हजार ...