June 28, 2024 11:54 AM June 28, 2024 11:54 AM

views 5

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल सुरू

नैऋत्य मोसमी पावसाने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण अरबी समुद्र, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचा बहुतांश भाग, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेशच्या काही भागात मान्सूनची आगेकूच झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल सकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

June 16, 2024 2:46 PM June 16, 2024 2:46 PM

views 17

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदेभारत मध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदेभारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या दहा वर्षात ३५ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास-सोयी उपलब्ध करुन देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पाद...