December 17, 2025 12:48 PM December 17, 2025 12:48 PM

views 3

INAS 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

INAS 335 ऑस्पेज हे दुसरं MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर स्कॉड़्रन नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. गोव्यातल्या INS हंसा या नौदलतळावर आज दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत I N A S 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. अत्याधुनिक शस्त्र, सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या I N A S 335 ऑस्पेजमधे पाणबुडीविरोधी युद्ध, पृष्ठभागावरल्या हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता आहे. यामुळे नौदलाची लांबपल्ल्यावर मारा  करण्याची क्षमता वाढणार आहे. 

October 22, 2025 1:39 PM October 22, 2025 1:39 PM

views 12

नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून सुरु

भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होईल. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षास्थितीचा आढावा घेतील.   लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयाने हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करणं हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ही प...

August 26, 2025 10:14 AM August 26, 2025 10:14 AM

views 1

भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक युद्ध नौकांचं आज जलावतरण

भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्ध नौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन फ्रंटलाइन सर्फेस कॉम्बॅटन्स एकाच वेळी जलावतरण करण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.   संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांमध्ये रचना, शस्त्रे आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून सागरी मोहिमांना सा...

June 22, 2025 3:28 PM June 22, 2025 3:28 PM

views 13

भारतीय नौदल ‘तमाल’ या लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार

भारतीय नौदल येत्या १ जुलै रोजी रशियातल्या कॅलिनिनग्राड इथं ‘तमाल’ या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे. भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन दशकात रशियाकडून समाविष्ट होणाऱ्या क्रीवाक श्रेणीतल्या लढाऊ जहाज मालिकेतलं हे आठवं जहाज आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 

April 7, 2025 9:00 PM April 7, 2025 9:00 PM

views 17

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला प्रारंभ

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या १२ महिला अधिकाऱ्यांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी IASV त्रिवेणी या नौकेवरच्या या चमूला झेंडा दाखवून सेशेल्सच्या दिशेनं रवाना केलं. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकंदरीत १२ महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अशी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतली आहे. या वर्षी जगप्रदक्षिणेला निघण्यापूर्वीची ही सराव मोहीम आहे. मोहिमेचं नेतृत्व कॅप्टन डॉली बुटोला यांच्याक...

March 27, 2025 1:09 PM March 27, 2025 1:09 PM

views 24

शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने काल ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर इथे शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात कमी उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं.   या क्षेपणास्त्राची प्रणाली भारतातच विकसित झाली असून यात रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, मल्टी फंक्शन रडार आणि वेपन कंट्रोल सिस्टिम बसवण्यात आले आहेत. या यशस्वी चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचं अभिनंदन केलं आहे.   ही प्राणी...

February 27, 2025 1:34 PM February 27, 2025 1:34 PM

views 16

नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून पहिल्याच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेतली. या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सीकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र टाकण्याची क्षमता सिद्ध झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी DRDO, भारतीय नौदल आणि उद्योगांचं अभिनंदन केलं. या चाचण्यांमुळं क्षेपणास्त्राचे मॅन-इन-लूप वैशिष्ट्य सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

January 5, 2025 12:59 PM January 5, 2025 12:59 PM

views 25

फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका ‘चार्ल्स डी गॉल’ गोव्यात दाखल

भारत  आणि फ्रान्स  यांच्यातील  वरुण  या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी  फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर  काल या विमानवाहू नौकेचं  आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं. उभय देशांच्या नौदलांमधे कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा या सरावाचा  उद्देश आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी फ्रान्स आणि भारत नियमितपणे परस्पर सहकार्य करत  आहेत. 

December 2, 2024 2:51 PM December 2, 2024 2:51 PM

views 15

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाजं आणि पाणबुड्या दाखल होणार

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाज आणि पाणबुड्या सामील केल्या जातील असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं. ६२ जहाज आणि एक पाणबुडी निर्माणाधिन असून पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यात एक जहाज नौदलात सामील करून घेतलं जाईल असं त्रिपाठी म्हणाले. वार्षिक नौदल दिवसाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. ४ डिसेंबर रोजी ओदिशातल्या पुरी इथं नौदल दिवस साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल, असं त्रिपाठ...

November 29, 2024 1:22 PM November 29, 2024 1:22 PM

views 5

भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत ५०० किलोचे अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने श्रीलंकन नौदलाच्या सहकार्याने आज अरबी समुद्रात दोन मासेमारी नौकांमधून क्रिस्टल मेथ म्हणून ओळखले जाणारे सुमारे ५०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. भारतीय नौदलाने एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. या दोन्ही नौका आणि  जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत.