March 8, 2025 3:02 PM March 8, 2025 3:02 PM
10
World Junior Chess Champion : भारतीय ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेशला विजेतेपद
मॉन्टेनेग्रो इथं काल झालेल्या फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेशनं विजेतेपद पटकावलं. विश्वनाथन आनंद, पेंटाला हरिकृष्ण आणि अभिजीत गुप्ता यांच्यानंतर प्रणव हा जागतिक ज्युनियर अजिंक्यपद जिंकणारा चौथा भारतीय ठरला. दरम्यान चेक प्रजासत्ताक इथं झालेल्या प्रतिष्ठित प्राग बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या अरविंद चिथंबरमनं सुवर्ण पदक जिंकलं. या विजयासह अरविंदचा समावेश जागतिक क्रमवारीत पहिल्या पंधरा खेळाडुंमध्ये झाला आहे.