January 27, 2025 9:35 AM January 27, 2025 9:35 AM

views 5

श्रीलंकेच्या नौदलाकडून ३४ भारतीय मच्छिमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलानं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३४ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. बेकायदेशीर मासेमारीसाठीच्या तीन ट्रॉलिंग बोटीही जप्त केल्या आहेत. या बोटींनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे उल्लंघन केल्याबद्दल त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, ४१ भारतीय मच्छिमारांना देशात परत पाठवण्यात आलं असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयानं दिली आहे. मच्छिमार संघटनांनी या अटकेचा निषेध केला आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात दंड न लावता मच्छिमारांना सोडण्यासाठी कारवाई करण्याची विनंती केली.

December 19, 2024 10:03 AM December 19, 2024 10:03 AM

views 10

बहारिनमध्ये अटक २८ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले

बहारिनमध्ये अटक करण्यात आलेल्या २८ भारतीय मच्छिमारांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे. तमिळनाडूतल्या या मच्छिमारांना गेल्या सप्टेंबर महिन्यात बहारिनच्या सागरी हद्दीत अवैधरित्या प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी तिथल्या भारतीय दूतावासानं यशस्वी प्रयत्न केले. या सर्वांना अटकेत असताना दूतावासानं सर्व प्रकारची मदत केली तसंच भारतात परतण्याचा प्रवास खर्चदेखील केला.

December 13, 2024 8:12 PM December 13, 2024 8:12 PM

views 9

पाकिस्तान कारागृहातल्या २,६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका – मंत्री डॉ.एस जयशंकर

केंद्रसरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात पाकिस्तानच्या कारागृहात खितपत पडलेल्या २ हजार ६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे, अशी  माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.  पाकिस्ताननं यावर्षी  २११ भारतीयांना ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे, त्यापैकी २४ जण दमण आणि दीवमधले मच्छिमार आहेत.या सर्वांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना जलद मायदेशी रवाना करण्याची कार्यवाही करावी असं पाकिस्तान सरकारला सांगितल्याचं जयशंकर म्हणाले...