January 2, 2025 2:34 PM January 2, 2025 2:34 PM

views 12

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल अविर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून, संयुक्त अरब अमिरातीतल्या १५ हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित करण्यासाठी सहाय्य करण्यात आलं. चार महिने चाललेल्या या कार्यक्रमात भारतीय वाणिज्य दूतावासानं २ हजार ११७ पारपत्र आणि ३ हजार ५८९ आपत्कालीन प्रमाणपत्र जारी केली. या दरम्यान ३ हजार ७०० पेक्षा जास्त लोकांना य...

September 26, 2024 2:37 PM September 26, 2024 2:37 PM

views 18

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे. दरम्यान, इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५५८ जणांचा मृत्यू झाला असून अठराशे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५० बालकांचा समावेश आहे.

August 31, 2024 8:19 PM August 31, 2024 8:19 PM

views 10

व्हिएतनाममध्ये सायबर घोटाळे करणाऱ्यांच्या ताब्यातून ४७ भारतीयांची सुटका

व्हिएतनाममध्ये लाओस इथल्या सायबरकेंद्रामध्ये अडकलेल्या सत्तेचाळीस भारतीयांना भारतीय दूतावासाने सोडवलं आहे. ही सायबर केंद्रे म्हणजे सायबर घोटाळे करणारी केंद्रे होती.  बोकिओ परगण्यातल्या  गोल्डन ट्रँगल सेझमध्ये  ही केंद्रे  सुरु होती. भारतीय दूतावासाने त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती दिली आहे. या सेझ मधल्या बेकायदेशीर कृत्यांचा छडा लावल्यावर यापैकी २९ जणांना भारतीय दूतावासाच्या स्वाधीन करण्यात आलं तर १८ जणांनी स्वतः दूतावासाशी संपर्क साधला. भारतीय राजदूतांनी त्यांची भेट घेऊन त...