October 18, 2025 7:46 PM October 18, 2025 7:46 PM
163
जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज
वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. जीएसटीतल्या सुधारणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...