May 5, 2025 7:35 PM May 5, 2025 7:35 PM

views 5

‘पाक’ची डिजिटल घुसखोरी ! भारतीय लष्कराच्या वेबसाइटला केलं लक्ष्य

पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन  आणि विश्लेषण संस्थेमधली संवेदनशील माहिती कथितरित्या चोरली असं सूत्रांनी सांगितलं. या हल्लेखोरांनी संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांचा वैयक्तिक तपशील आणि त्यांचे वेबसाईट लॉग इनचे तपशील हॅक केले असावेत असा अंदाज आहे.   याशिवाय आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेडची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न देखील झाल्य...