October 12, 2024 4:35 PM

views 13

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यानं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने तेलंगणा इथं पोलीस उप अधीक्षकाचा पदभार स्वीकारला. सिराज आणि मुष्टियोद्धा निखत जरीन यांनी आपापल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा तेलंगणा सरकारने दिली होती. त्यानुसार आज सिराज याने उप अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. या नोकरीसह सिराज भारतीय क्रिकेट संघातही खेळू शकणार आहे.

August 1, 2024 7:34 PM

views 14

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षाचे होते. गायकवाड १९७५ ते १९८७ या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ४० कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले.. २०१७-१८ यावर्षीच्या सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते निवड समितीचे सदस्य होते त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे ते प्रमुख प्रशिक्षकही होते. त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं.   प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगतात आणि क...