April 15, 2025 10:35 AM April 15, 2025 10:35 AM

views 17

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं – भूषण गवई

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात देशानं अनेक बाह्य आक्रमणं आणि अंतर्गत कलहाचा सामना केला आहे, तरीही काळानुरुप बदल स्वीकारत घटनेत दुरुस्ती करण्यात आल्यानं तो एकसंघ आणि मजबूत आहे, असंही गवई म्हणाले.

January 9, 2025 7:21 PM January 9, 2025 7:21 PM

views 13

पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीनं पुण्यात 'संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. स्पर्धकांची नावनोंदणी सुरू झाली असून येत्या २५ तारखेला पहाटे ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून ही स्पर्धा सुरू होईल.