November 26, 2024 3:04 PM November 26, 2024 3:04 PM

views 13

अंदमानजवळच्या समुद्रात मच्छिमार बोटीत भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने काल अंदमानजवळच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीतून अवैध अंमली पदार्थ पकडले. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानांनी आपल्या नियमित गस्तीदरम्यान या बोटीच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. ही बोट समुद्राच्या भारतीय हद्दीत बॅरन बेटाजवळ असताना संयुक्त कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीवर जाऊन झडती घेतली. बोटीवरच्या कर्मचाऱ्यांसह साधारण ५ हजार ५०० किलो अंमली पदार्थ आणि एक सॅटेलाईट फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. या बोटीवरचे सहाही कर्मचारी म्यानमाचे नागरीक असल्याचं आढळलं. भारतीय तटरक्षक दलाने...

August 18, 2024 1:21 PM August 18, 2024 1:21 PM

views 14

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चेन्नई दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून चेन्नईत उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं तसंच सागरी प्रदुषण प्रतिसाद केंद्र तसंच पुद्दुचरी इथं उभारण्यात आलेलं तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हचं उद्घाटनही सिंह यांच्या होणार आहे. चेन्नईस्थित प्रदुषण केंद्र, सागरी प्रदुषण व्यवस्थापनातलं अग्रगण्य पाऊल आहे. या केंद्रामुळे सागरी प्रदुषणाच्या घटना विशेषतः किनारपट्टीलगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तेल आणि रसायन गळतीच्या घटनांमध्ये प्...