February 16, 2025 6:54 PM February 16, 2025 6:54 PM

views 11

भारतीय भांडवल बाजारातून परदेशी गुंतवणुकीची माघार

भारतीय भांडवली बाजारामधून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१ हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. जानेवारीत एकंदर ७८ हजार २७ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती.   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इतर देशांमधून आयात मालावर अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सावध पवित्रा घेतला असावा, असं बाजार वर्तुळातल्या तज्ञांचं मत आहे.