November 9, 2024 11:25 AM November 9, 2024 11:25 AM

views 10

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाला नवी दिल्लीत सुरूवात

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं. जागतिक आणि भारतीय थिंक टँक, व्यावसायिक, सरकारी आणि खासगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्रित आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्करी वारसा यावर लक्ष केंद्रित करण्याचा या दोन दिवसीय महोत्सवाचा उद्देश आहे. यावेळी जनरल चौहान यांनी शौर्य गाथा या प्रकल्पाचा प्रारंभ केला. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि सं...