October 22, 2025 3:25 PM October 22, 2025 3:25 PM

views 96

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन्ह लावून त्याला अधिकृतपणे बढती दिली.   ऑगस्ट २०१६मध्ये चोप्रा याला भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू करण्यात आलं होतं. त्याला मिळालेल्या अर्जुन पुरस्कार आणि खेल...

August 5, 2025 1:17 PM August 5, 2025 1:17 PM

views 13

मद्यधुंद सैनिकानं वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची बातमी खोटी !

नागपूरमध्ये एका मद्यधुंद सैनिकानं आपल्या वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरधन इथं रविवारी घडलेल्या घटनेचं वृत्तसंस्थानी चुकीचं वार्तांकन केलं, असंही लष्करानं स्थानिक पोलिसांकडून घटनेची खरी माहिती घेऊन स्पष्ट केलं आहे.   सध्या सुट्टीवर असलेला लष्करातला जवान रविवारी घरी परतत असताना पार्किंगवरून त्याचा स्थानिकांशी वाद झाला. नंतर त्याची चारचाकी झाडाला धडकून अपघात झाला होता. मात्र, या अपघातात कोणत्य...

July 22, 2025 7:35 PM July 22, 2025 7:35 PM

views 43

भारतीय नौदलाचं उद्या एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन

भारतीय नौदलानं  उद्या नवी दिल्लीत एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन केलं आहे.  जहाजबांधणीद्वारे राष्ट्रबांधणी या विषयावर होणाऱ्या या चर्चासत्रात सरकारी विभाग , भारतीय नौदल, शिपयार्ड, उद्योग, वर्गीकरण संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख सहभागी होणार आहेत.  या चर्चासत्रात जहाजबांधणीशी संबंधित विविध धोरणात्मक पैलूंवर तसंच जागतिक पातळीवर  राबविल्या जाणाऱ्या भविष्यकालीन तंत्रज्ञानावर  चर्चा करण्यात येणार आहे.

May 31, 2025 6:37 PM May 31, 2025 6:37 PM

views 9

भारतीय लष्कराची देशभरात अत्याधुनिक नवीन पीढीच्या संरक्षण तंत्रज्ञानाची चाचणी

भारतीय लष्कर देशभरात प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक नवीन पीढीच्या संरक्षण तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. यामध्ये पोखरण फील्ड फायरिंग रेंज, बाबिना फील्ड फायरिंग रेंज आणि जोशीमठ यांचा समावेश आहे. अत्याधुनिक संरक्षण प्रणालींच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्ध सिम्युलेशनचा वापर केला जात आहे. आग्रा आणि गोपालपूर इथं हवाई संरक्षण उपकरणांचे प्रात्यक्षिक देखील होणार आहे.  या प्रात्यक्षिकात अनेक संरक्षण उद्योग भागीदार देखील सहभागी होत आहेत.

May 19, 2025 1:42 PM May 19, 2025 1:42 PM

views 67

युद्धबंदी संपण्याची कोणतीही तारीख देण्यात आली नाही- भारतीय लष्कर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला शस्त्रसंधी काल संपल्याचा दावा करणारं वृत्त भारतीय लष्करानं फेटाळून लावलं.   भारत आणि पाकिस्तान यांच्या सैनिकी कारवाई महासंचालकांमधे १८ मे रोजी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, १२ मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता, शस्त्रसंधी संपण्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, असं लष्करानं स्पष्ट केलं.   या चर्चेत दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करू नये, एकमेकांंविरोधात कोणतंही आक्रमक वक्तव्य करू नये, असं ठरलं होतं. सीमाभागात तैनात केलेल...

May 8, 2025 6:53 PM May 8, 2025 6:53 PM

views 30

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमधे समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त  केली.  देशातल्या  सद्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा  घेतला. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. संरक्षण यंत्रणा मजबूत करणं, अफवांना रोखणं आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणं या मुद्यांचा यात समावेश ...

March 28, 2025 9:50 AM March 28, 2025 9:50 AM

views 55

जम्मू आणि काश्मिरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; 3 जवानांना वीरमरण

जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात सुफियाच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवानांना वीरमरण आलं. तर एका पोलिस उपअधीक्षकांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि पॅरा कमांडो जवान जखमी झाले आहेत. जुधाना भागातील जंगलात काल सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरु असताना या लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

March 9, 2025 1:29 PM March 9, 2025 1:29 PM

views 9

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांची शोधमोहिम

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली. मणिपूरमध्ये जिरीबाम, तेंग्नोपाल, काकचिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २५ शस्त्रं, आयईडी, ग्रेनेड, दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली. तसंच, कांगपोकपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले. 

December 28, 2024 2:46 PM December 28, 2024 2:46 PM

views 12

सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना

नेपाळमधे सालझंडी इथं होणाऱ्या सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना झाली आहे. या सरावाची ही १८वी फेरी असून भारताच्या तुकडीत ३३४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या महिनाअखेरीपासून येत्या १३ जानेवारीपर्यंत हा सराव चालेल. घनदाट जंगलांमधे सशस्त्र अतिरेक्यांच्या कारवाया थोपवण्यासाठी तसंच नैसर्गिक आपत्ती काळात दुर्गम भागात मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण या सरावात दिलं जाणार आहे. त्याखेरीज जलद कारवाईसाठीची तयारी, हवाई मार्गाने हलचाली, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण संरक्षणाच्या...

November 5, 2024 7:26 PM November 5, 2024 7:26 PM

views 118

भारतीय लष्कराकडून येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत भरती रॅलीचं आयोजन

अग्नीवीर योजने अंतर्गत, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेल्या, महाराष्ट्रातल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांमधल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय लष्कराने येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विरारमधल्या जीवदानी मैदानावर भरती रॅली आयोजित केली आहे. भरती रॅलीचा हा दुसरा  टप्पा आहे.    एप्रिल २०२४ मध्ये  ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेले सर्व धार्मिक गुरु  असलेले उमेदवार देखील या रॅलीला उपस्थित राहतील. भरती र...