May 7, 2025 7:14 PM May 7, 2025 7:14 PM
6
राज्यात ठिकठिकाणी ‘मॉकड्रिल’
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवता यावी, तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं, यासाठी आज ही सराव प्रात्यक्षिकं करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी ही प्रात्यक्षिकं झाली. रायगड जिल्ह्यात उरणमध्ये झालेल्या मॉक ड्रिलमध्ये विविध विभागांनी सहभाग नोंदवला. पुणे जिल्ह्यातही अतिसंवेदनशील ठिकाणी सर्व संबंधित यंत्रणां...