November 23, 2025 8:01 PM

views 20

भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणारअसल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणार असल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तेजस विषयी समाज माध्यमावर प्रसारित होत असलेलं पत्र बनावट असल्याचं, पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने म्हटलं आहे. काही समाजमाध्यमावरच्या काही पाकिस्तानी प्रचार खात्यांकडून हे पत्र पसरवले जात असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.

November 21, 2025 7:27 PM

views 26

दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील, असं हवाई दलानं कळवलं आहे.  यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं. गेल्या २३ वर्षांपासून ही विमान भारतीय वायू दलाच्या सेवेत आहेत.

May 11, 2025 8:47 PM

views 43

ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाची कामगिरी राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण

भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमधे सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणाने राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे. अद्याप ही कारवाई सुरु असल्यानं त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाईदलाच्या सूत्रांनी सांगितलं. यासंदर्भात अधिक तर्क लढवू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं हवाईदलानं स्पष्ट केलं आहे. 

May 9, 2025 1:48 PM

views 26

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राखला. जम्मू सतवारी, सांबा, आर एस पुरा आणि आर्निया इथं पाकिस्तानच्या दिशेनं आलेली ८ क्षेपणास्त्र मधेच रोखून निकामी करण्यात आली. सीमासुरक्षा दलानं काल जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न ह...

January 16, 2025 8:23 PM

views 20

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग २९, राफेल, सुखोई ३०, जग्वार, अपाचे,  C-130 आणि C - 17 यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील.    याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्रदर्शन करेल. १४८ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व स्कान्ड्रन लीडर महेंद्र सिंह  हे करणार आहेत.  

October 8, 2024 2:37 PM

views 26

भारतीय हवाई दलातर्फे ९२व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

भारतीय हवाई दल आज आपला ९२वा वर्धापन दिन चेन्नईच्या तांबरम इथल्या आपल्या तळावर साजरा करणार आहे. या निमित्ताने संचलन आणि हवाई प्रात्यक्षिकांचं सादरीकरण होईल. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

October 8, 2024 2:33 PM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. साहस आणि कठोर व्यावसायिक दृष्टिकोन ही हवाई दलाची वैशिष्ट्यं आहेत. आणि देशाच्या संरक्षणामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका ही अत्यंत कौतुकास्पद आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.

August 17, 2024 2:57 PM

views 48

भारतीय हवाई दल आणि लष्कराची अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची यशस्वी मोहीम

भारतीय हवाई दल आणि लष्करानं संयुक्तरीत्या जवळपास १५ हजार फूट उंचीवरच्या भागातल्या अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची मोहीम यशस्वी केली आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या भागांना मदत पोहोचवण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार ही मोहीम राबवल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलानं सुपर हरक्युलस या वाहतूक विमानाद्वारे हे अत्यावश्यक सामान अचूक पद्धतीनं अतिदक्षता केंद्रापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं.

June 26, 2024 10:41 AM

views 48

नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात काल तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाचा समारोप

भारतीय वायुसेनेने काल नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाच्या समारोपात एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं.   कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने 'इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर अँड इम्पेरेटिव्ह फॉर कंटेम्पररी नॅशनल सिक्युरिटी' हा या परिसंवादाचा विषय होता. भू-राजकारण, भव्य रणनीती आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्तीची सखोल माहिती देण्यासाठी WASP हा 15 आठवड्यांचा धोरणात्मक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.   या का...