November 7, 2025 2:20 PM November 7, 2025 2:20 PM

views 12

भारतीय बँका आता अधिक प्रगल्भतेनं काम करत आहेत – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

भारतातल्या बँका एका दशकापूर्वीच्या तुलनेत आता खूप प्रगल्भतेनं काम करत आहेत,असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज दिली. भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग आणि आर्थिक विषयावरच्या परिषदेत ते मुंबईत बोलत होते. २०१८मध्ये तोट्यात असलेली बँक ते आज १०० कोटी अमेरिकी डॉलरची उलाढाल करणारी कंपनी हा भारतीय स्टेट बँकेचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला.   बँकिंग क्षेत्रासाठी आणलेल्या विविध नियमनांमुळे कर्जाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाल्याची ग्वाही मल्होत्रा यांनी ...

September 21, 2025 7:09 PM September 21, 2025 7:09 PM

views 16

अमेरिकेतल्या भारतीयांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर

H 1B व्हिसासाठी १ लाख डॉलर आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तातडीच्या मदतीची गरज असलेल्या भारतीयांसाठी अमेरिकेतल्या भारतीय दुतावासानं आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर केला आहे.     H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे, असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलीन लीविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट  केलं. H 1B व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते १ लाख डॉलर करण्याच्...

August 27, 2025 8:22 PM August 27, 2025 8:22 PM

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांमधे ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सिफ्त कौर सर्मा, आशी चौक्सी, आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टलमधे भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं, आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   याच प्रकारात सांघिक स्पर्धेतही भारतानं रौप्य पदक पटकावलं. दक्षिण...

March 12, 2025 10:31 AM March 12, 2025 10:31 AM

views 32

भारतीय महिला कबड्डी संघाचा क्रीडा मंत्र्यांकडून सत्कार

भारतीय महिला कबड्डी संघाचा ६व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सत्कार केला. त्यांनी या संघाला 67 लाख 50 हजार रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. महिला खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. पुरुषांच्या लीगप्रमाणेच, महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार महिला कबड्डी लीग सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

January 17, 2025 8:32 PM January 17, 2025 8:32 PM

views 43

रशियाच्या लष्करात कार्यरत १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार, १६ जण बेपत्ता

रशियाच्या लष्करात कार्यरत असलेले १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार झालेत तर १६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी दिली. रशियाच्या लष्करात कार्यरत असलेल्या ९६ भारतीय वंशाच्या नागरिकांना सेवेतून मुक्त केलं असून ते मायदेशी परतले आहेत.   बांगलादेशाबरोबर भारताला सौहार्दपूर्ण संबंध हवे असल्याचं जैयस्वाल यांनी सांगितलं.  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारताकडून परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक...

September 9, 2024 6:12 PM September 9, 2024 6:12 PM

views 16

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. आज सकाळी साडे दहा वाजता परेडने सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारताचे बाराशे सैनिक तसंच अमेरिकन लष्कराचे सैनिक सहभागी झाले आहेत. हा सराव पंधरा दिवस चालेल. या सरावा दरम्यान अमेरिकेच्या तोफखाना यंत्रणेचं प्रात्यक्षिण केलं जाणार आहे. दोन्ही लष्करांची क्षमता वाढवणं आणि गरज पडेल तेव्हा एकत्र काम करणं शक्य व्हावं यासाठी हा युद्ध सराव घेतला जात आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय लष्करी संबंधांच्या पार्श्वभूमी...

August 17, 2024 2:23 PM August 17, 2024 2:23 PM

views 114

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल...