June 29, 2025 7:18 PM June 29, 2025 7:18 PM

views 44

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या विजेतेपदांसाठी लढती

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-२३, २१-१५, २१-१४ असं हरवून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठी आज रात्री त्याची लढत तृतीय मानांकित कॅनेडियन खेळाडू ब्रायन यांगशी होणार आहे.. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. आता तिचा सामना चीनच्या बेईवेन झांग बरोबर होणार आहे. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल.  

June 29, 2025 3:40 PM June 29, 2025 3:40 PM

views 46

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मानधनाने कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकत तडाखेबंद ११२ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

June 29, 2025 2:51 PM June 29, 2025 2:51 PM

views 14

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. पोलिना बुरहोवा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. ६६व्या स्थानावर असलेल्या तन्वीचा सामना विजेतेपदासाठी २१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बेईवेन झांगशी आज होणार आहे. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-...

June 27, 2025 3:54 PM June 27, 2025 3:54 PM

views 10

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. MSME क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं. MSME क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं ...

June 27, 2025 2:06 PM June 27, 2025 2:06 PM

views 21

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज अधोरेखित करत परस्पर मतभेद कमी करून सीमा वाद ...

June 24, 2025 10:41 AM June 24, 2025 10:41 AM

views 14

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडच्या घटनांचा आढावा घेतला आणि भारत-चीन द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्यासाठी उभय देशातील जनतेचे परस्पर संबंध मजबूत करण्यावर भर दिला. &...

June 23, 2025 9:59 AM June 23, 2025 9:59 AM

views 3

पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २७ पदकं

थायलंडमध्ये पार पडलेल्या दिव्यांगांसाठीच्या पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ४ सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कास्य पदकांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेते क्रिडापटू नितेश कुमार, थुलासिमथी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांचा समावेश आहे.

June 22, 2025 2:49 PM June 22, 2025 2:49 PM

views 13

ITF J200 Gladbeck टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरनला विजेतेपद

भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन हिनं जर्मनीत आयोजित आईटीएफ कनिष्ठ गट दोनशे, ग्लेडबेक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सोळा वर्षीय मायानं अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोलिया मान्तान हिचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. मायाचं आईटीएफ कनिष्ठ गट स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे.

June 21, 2025 3:17 PM June 21, 2025 3:17 PM

views 17

तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील सामन्यात भारताची दमदार सुरुवात

इंग्लंडमधल्या हेडींग्ले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद ३५९ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुल ४२ धावांवर तर कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं १०१ धावा केल्या तर कर्णधार शुभमन गिल १२७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर खेळत आहेत.

June 20, 2025 1:38 PM June 20, 2025 1:38 PM

views 7

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिका आजपासून होणार सुरु

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषकाच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली क्रिकेट कसोटी आज इंग्लंडमधल्या हेडिंग्ले, लीड्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. नवनियुक्त भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दरम्यान, काल अनुभवी खेळाडू जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अँडरसन-तेंडुलकर चषकाचं अनावरण करण्यात आलं.