September 22, 2025 10:27 AM September 22, 2025 10:27 AM

views 17

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

September 21, 2025 7:58 PM September 21, 2025 7:58 PM

views 17

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी उपविजेती

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधन मानावं लागलं. शेनझेन इथं आज अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला.  

September 21, 2025 9:32 AM September 21, 2025 9:32 AM

views 73

महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला ५० षटकांचा तिसरा आणि निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलियानं ४३ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं २-१ असा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं ४८ षटकांत सर्व गडी बाद ४१२ धावा केल्या. विजयासाठी ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचे सर्व फलंदाज ३६९ धावांवर बाद झाले.  

September 20, 2025 1:44 PM September 20, 2025 1:44 PM

views 129

इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर इथे समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात आज ते बोलत होते. आपलं इतर देशांवरचं अवलंबित्व जेवढं कमी होईल तेवढी आपली शक्ती वाढेल असं ते म्हणाले. समुद्र से समृद्धी या कार्यक्रमामध्ये ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं.   यामध्ये किनारपट्टीशी संबधित ७ हजार ८०० रुपयांच्या प्रमुख विकास प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी ६६ हजार कोटी रुपयांचे २१ सा...

September 20, 2025 12:02 PM September 20, 2025 12:02 PM

views 26

दहशतवादावर कठोर कारवाईचं भारताचं आवाहन

जगभरातील देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुध्दची कारवाईला बळकटी देण्याचं आणि कारवाई तीव्र करण्याचं आवाहन काल भारतानं केलं. पाकिस्तान, दहशतवाद आणि पाकिस्तान सैन्यदल यांच्यादरम्यान संगनमत असल्याबद्दल जगाला कल्पना आहे.   पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांद्वारे नव्यानं जारी केलेल्या व्हिडिओंसंदर्भात माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, अशा घटनांमुळे परिस्थिती अधिक स्पष्ट होते.

September 20, 2025 10:57 AM September 20, 2025 10:57 AM

views 76

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर फोरमध्ये दाखल

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 167 धावा करू शकला.   अर्शदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतरराष्ट्रीय टी-20 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या स्पर्धेत भारतानं यापूर्वी जिंकलेल्या दोन सामन्यांसाठी चार गुण मिळवून सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. ओमानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.  

September 19, 2025 6:16 PM September 19, 2025 6:16 PM

views 11

दहशतवादाविरोधात लढा अधिक बळकट करण्याचं भारताचं आवाहन

सर्व स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात  लढा अधिक बळकट करण्याचं आवाहन भारतानं जागतिक समुदायाला केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत माध्यमप्रतिनिधींना सांगितलं की,  प्रत्येक देशानं सीमापार दहशतवादाचा निकरानं मुकाबला केला पाहिजे. ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि इतर कोणत्याही मंचावर संमत झालेल्या सर्व ठरावांमधे दहशातवादाचा कडाडून विरोध असला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. नेपाळमधे सुशीला कार्की यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाल्याचं भारत...

September 15, 2025 10:19 AM September 15, 2025 10:19 AM

views 29

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.   ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित करत असून पेहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं  कर्णधार सुर्यकुमार य...

September 11, 2025 2:28 PM September 11, 2025 2:28 PM

views 22

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानचा नकार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.   पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल, त्यामुळे हा सामना रद्द करावा अशी याचिका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर तातडीने सुनावणी घ्यायला आज न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठाने...

August 27, 2025 8:16 PM August 27, 2025 8:16 PM

views 14

निर्यात वाढवण्यासाठी ४० देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा भारताचा निर्णय

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, खरेदीदार-विक्रेते यांच्या बैठका, विभिन्न उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत.   यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय या आठवड्यात निर्यातदारांची बैठक घेणार आहे. यात अधिकाध...