October 14, 2025 8:15 PM October 14, 2025 8:15 PM

views 36

वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं ७ गडी राखून जिंकला. या विजयामुळं भारतानं ही मालिकाही २-० अशी जिंकली आहे. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.

October 13, 2025 8:14 PM October 13, 2025 8:14 PM

views 34

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्पबेलनं ११५, तर शाई होपनं १०३ धावा केल्या. ३९० धावांवर त्यांचा डाव संपला. &nb...

October 10, 2025 1:31 PM October 10, 2025 1:31 PM

views 19

‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगणिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज’

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानाने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केला आहे. नवी दिल्ली इथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतरच्या भाषणात ते बोलत होते. दोन्ही देशांची विकास आणि समृद्धबाबतची वचनबद्धता समान आहे. सरकार अफगाणिस्तानाच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याचं जयंशकर यावेळी म्हणाले.   काबुलमधल्या भारताच्या तांत्रिक मिशनला भारतीय दुतावासा...

October 10, 2025 9:49 AM October 10, 2025 9:49 AM

views 185

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत

भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या आधीचा सामना भारताने जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फटकावलेल्या 94 धावा विशेष लक्षवेधी ठरल्या.

October 5, 2025 7:48 PM October 5, 2025 7:48 PM

views 30

WPAC 2025 : भारताच्या सिमरनला २०० मीटर धावण्याच्या T12 प्रकारात कांस्यपदक

दिव्यांगांच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या टी–12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं  २४ पूर्णांक ४६ सेकंदांत धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला. कोलंबियाच्या पेरेझ लोपेझ आणि ब्राझीलच्या बारोस दा सिल्वा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली.  भारताची एकूण पदकसंख्या आता १९ झाली आहे.

October 5, 2025 8:20 PM October 5, 2025 8:20 PM

views 48

अल ऐन मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पटकावलं विजेतेपद

अबू धाबी इथं सुरू असलेल्या अल ऐन मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियान्शी वलिशेट्टी हिनं महिला एकेरीचं, तर हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं, पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.  अंतिम फेरीत श्रियान्शीनं भारताच्याच तसनीम हिचा १५-२१, २२-२०,२२-२० असा ३ गेम्समध्ये पराभव केला. तर, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं इंडोनेशियाच्या रेमंड इंद्रा आणि निकोलस जोक्विन जोडीला, २१-१७, २१-१८ असं हरवलं. 

October 5, 2025 1:32 PM October 5, 2025 1:32 PM

views 30

दिव्यांगांसाठीच्या अथलेटिक्स स्पर्धांमधे भारताची पदक संख्या १८

नवी दिल्लीत झालेल्या दिव्यांगांसाठीच्या अथलेटिक्स स्पर्धांमधे भारतानं काल ३ पदकं जिंकली त्यामुळे आता भारताची पदक संख्या १८ झाली आहे. यामध्ये ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५  कांस्य पदके आहेत. ही भारताची ऐतिहासिक कामगिरी असून पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानी आहे.  काल एकता भुयान हिनं क्लब थ्रो मध्ये, सोमन राणानं शॉट पुट मध्ये रौप्य पदक तर प्रवीण कुमारनं उंच उडी मध्ये T64 गटात कांस्य पदक मिळवलं.   सर्वाधिक १२ सुवर्णपदकं ब्राझिलच्या संघाला मिळाली. ९ सुवर्णपदकं मिळवून चीन दुसऱ्या तर ८  मिळवून पोलंड तिसऱ्...

October 3, 2025 1:43 PM October 3, 2025 1:43 PM

views 42

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमधे भारत दौऱ्यावर येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्केव यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

September 24, 2025 1:39 PM September 24, 2025 1:39 PM

views 11

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका

पाकिस्तान भारताविरुद्ध निराधार आणि प्रक्षोभक निवेदनं देऊन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या ६० व्या अधिवेशनात जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी राजदूत क्षितीज त्यागी यांनी,  पाकिस्ताननं भारतीय भूभाग बळकावण्याऐवजी तो खाली करून  मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला या अवस्थेतून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करावं अशा शब्दात सुनावलं. दहशतवाद्...

September 22, 2025 1:23 PM September 22, 2025 1:23 PM

views 15

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

अमेरिकेत न्यूयॉर्क इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ऐंशीव्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्री थेरेसा लाझारो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. फिलिपिनचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांनी अलिकडेच भारताचा दौरा केला होता. या भेटीत राजकीय, संरक्षण तसंच सागरी क्षेत्रात सक्रिय सहकार्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी आपल्या धोरणात्मक भागीदारासाठी वचनबद्ध...