June 14, 2024 11:56 AM

views 28

कुवेतमधून भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार आहेत. मृतांमध्ये केरळमधले २३ नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरेल आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होईल अशी माहिती कुवेतमधल्या भारतीय वकीलातीनं दिली आहे. दरम्यान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग काल कुवेतला पोहोचले असून मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणण्यासाठी आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी कुवेतमधल्या सरकारसोबत चर्चा केली. तसंच रुग्णालयात जाऊन ...

June 13, 2024 9:12 PM

views 33

१ जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यांबाबत जाणून घेण्यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध

देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम १ जुलैपासून लागू केले जाणार आहेत. नव्या कायद्यांबाबत जाणून घेण्यासाठी “NCRB Sankalan of Criminal Laws” हे मोबाईल ॲप, गुगल प्लेस्टोअरवर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. सामान्य नागरिक, न्यायालयातले अधिकारी, वकील, कायद्याचे विद्यार्थी, तसंच पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कायद्यांबाबत आपलं ज्ञान वाढवण्यासाठी हे ॲप मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे.

June 13, 2024 4:45 PM

views 69

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्मन जोडीदार आंद्रे बेगेमन यांचा सामना नेदरलँड्सच्या जेस्पर डी जोंग आणि रायन निजबोअर यांच्याशी होईल.