August 9, 2024 3:41 PM August 9, 2024 3:41 PM

views 8

देशाच्या लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ

देशाच्या खनिज उत्पादनात वाढ झाली असून २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. चुनखडीच्या उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. तर चुनखडीचं उत्पादन साडेचारशे मेट्रिक टन झालं होतं. मँगनीज उत्पादन ११ टक्क्यांनी वाढलं आहे.  

August 9, 2024 10:25 AM August 9, 2024 10:25 AM

views 12

भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल हॉकी इंडियाकडून हॉकी संघाला बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कास्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे.   ऑलिम्पिक मध्ये भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल भारताच्या पुरुष हॉकी संघाला हॉकी इंडियाने बक्षीस जाहीर केल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये तर संघाच्या सहकार...

August 8, 2024 7:33 PM August 8, 2024 7:33 PM

views 29

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी यांनी आज बीजभाषण दिलं. त्यावेळी ते बोलत होते. ‘व्यत्ययांशी जुळवून घेताना: लवचिकता, शाश्वतता आणि नवोन्मेष’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.   उत्पन्नाची पातळी वाढताना, भारतानं पिण्याचं पाणी, स्व...

August 6, 2024 3:06 PM August 6, 2024 3:06 PM

views 12

येत्या २ ते ३ दिवसांत देशात पावसाचा अंदाज

येत्या २ ते ३ दिवसांत देशाच्या पूर्व आणि वायव्य भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधेही आज तर पश्चिम आणि मध्य भारतात येत्या २ दिवसांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

August 5, 2024 1:30 PM August 5, 2024 1:30 PM

views 20

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. बांग्लादेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं ही सूचना केली आहे. सध्या बांग्लादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 12:12 PM August 5, 2024 12:12 PM

views 18

पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेची भारतावर मात

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 241 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 208 धावाच करु शकला. श्रीलंकेच्या जेफ्री व्हॅडरसनने भारताचे प्रमुख सहा गडी बाद केले.

July 31, 2024 8:22 PM July 31, 2024 8:22 PM

views 17

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पुढच्या फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं पॅरिस महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१-५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला.   पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानं सातवं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल...

July 30, 2024 8:58 PM July 30, 2024 8:58 PM

views 13

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ४ पदकं

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी ४ पदकं मिळवली असून त्यात ३ महाराष्ट्रातले आहेत. जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक मिळवलं. मुंबईतल्या अवनीश बन्सलनं रौप्यपदक तर कश्यप खंडेलवालने कांस्य पदक मिळवलं. याखेरीज हैद्राबादच्या हर्षिन पोसीनाला रौप्य पदक मिळालं. सौदी अरेबियामधे रियाध इथं झालेल्या या स्पर्धेत ९४ देशांमधले मिळून ३२७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

July 30, 2024 7:38 PM July 30, 2024 7:38 PM

views 13

पॅरिस ऑलिम्पिक : नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीला कास्यपदक

पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिंपिकमधे दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सरबजोत सिंग याने त्याचं पहिलं ऑलिंपिक पदक पटकावलं आहे.   भारताच्या हॉकी संघाने आयर्लंडवर २-० अशी मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या...

July 28, 2024 7:19 PM July 28, 2024 7:19 PM

views 7

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पराभूत

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. स्मृती मंधानानं सर्वाधिक ६० धावा केल्या. रिचा घोषनं १४ चेंडूत ३०, तर जेनिमा रॉड्रिग्जनं १६ चेंडूत २९ धावांंचं योगदान दिलं.   भारताची गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली. दिप्ती शर्मानं ४ षटकं टाकताना ३० धावा देत एक बळी मिळवला. तिच्या व्यतिरिक्त भारताच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला बळी मिळवत...