August 21, 2024 9:53 AM August 21, 2024 9:53 AM

views 14

नेपाळमधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताची परवानगी

नेपाळमधून १२ जल विद्युत प्रकल्पामधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयंतीत वाढ झाली असून, नेपाळमधील २८ प्रकल्पातून ९४१ मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीच नेपाळ वीज निर्यात करणारा महत्वाचा देश बनला असून, मागील आर्थिक वर्षात नेपाळणने सुमारे १४ अब्ज डॉलर्सची वीज निर्यात केली आहे.

August 20, 2024 1:21 PM August 20, 2024 1:21 PM

views 12

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, डिजिटल अर्थव्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात असं गोयल यांनी म्हटलं आहे. तेल आणि वायू उद्योगात भारत प्रगती करत असून मलेशियन कंपन्यांना यात अनेक...

August 20, 2024 1:52 PM August 20, 2024 1:52 PM

views 10

येत्या चार दिवसात देशात मुसळधार पावसाचा अंदाज

देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून येत्या चार दिवसात देशाच्या पूर्व,पश्चिम, वायव्य भागात तसंच मध्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय दक्षिणेकडील द्विपकल्प भागातही उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तसंच जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही येत्या २३ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मध्य प्रदेशच्या ९ जिल्ह्यांमधे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशा...

August 20, 2024 1:17 PM August 20, 2024 1:17 PM

views 18

भारत आणि जपानच्या मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत संवाद

भारत आणि जपानदरम्यान आज नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय संवाद होणार आहे. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तर जपानचे संरक्षणमंत्री किहारा मीनोरू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री योको कामिकावा या संवादात सहभागी होतील. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी नव्या उपक्रमांविषयी चर्चा होईल आणि द्विपक्षीय सहकार्याचाही आढावा घेतला जाईल. भारत आणि जपानशी संबंधित धार्मिक आणि जागतिक प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीमुळे धोरणात्मक आणि जा...

August 17, 2024 8:24 PM August 17, 2024 8:24 PM

views 18

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करावा लागतो आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हे देखील समाजाला धोकादायक असल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा; ‘विकास प्रक्रीयेत’ वाढता सहभाग या...

August 16, 2024 8:46 PM August 16, 2024 8:46 PM

views 17

सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा

परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाचं सहकार्य आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी आदी विषयांवर या चर्चेचा प्रामुख्यानं भर होता.

August 15, 2024 3:40 PM August 15, 2024 3:40 PM

views 15

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते, असंही शाह म्हणाले. सशक्त भारत उभा करण्याची शपथ सर्व भारतीयांनी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 14, 2024 1:15 PM August 14, 2024 1:15 PM

views 12

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर दहशतवादाच्या धोक्याविषयी यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज...

August 14, 2024 9:34 AM August 14, 2024 9:34 AM

views 6

भारत-अमेरिकेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढण्यासाठी सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अमेरिकेतल्या सरकारच्या लघु उद्योग प्रशासन विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत हे सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं कौशल्याचं आदानप्रदान करण्याबाबतच्या मुद्द्याचाही या करारात समावेश आहे. महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी तसंच दोन्ही देशातल्या महिला संचलित लघु उद्योगांमधल्या व्यापारी भागीदारीला चालना देण्यासाठी या करारानुसार संयुक्त उपक्रम ...

August 12, 2024 2:45 PM August 12, 2024 2:45 PM

views 13

पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्यानं समारोप

पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. एक रौप्य आणि पाच कास्य अशा एकंदर सहा पदकांसह भारत पदकतालिकेत ७१व्या स्थानावर राहिला. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत ४८व्या स्थानी होता. ४० सुवर्णपदकांसह एकंदर १२६ पदकं पटकावलेल्या अमेरिकेनं अव्वल, ९१ पदकांसह चीनने दुसरं, तर ५३ पदकांसह ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान मिळवलं. पॅ...