September 13, 2024 1:30 PM

views 26

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला ९ सुवर्णपदकं

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिने ४९ मीटर ९१ सेंटीमीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याच स्पर्धेत अमानत कंबोज हिने ४८ मीटर ३८ सेंटीमीटर थाळीफेक करत रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नीरू पहतक हिने ५४.५० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक तर ५४.८२ सेकंदांसह सँड्रा मोल साबू हिनं रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत नयन प्रदीप सरड...

September 13, 2024 9:31 AM

views 24

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करायला अमेरिकेचा पाठिंबा आहे. भारत, जपान आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाव म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. मात्र काही देशांचा या नवीन संशोधन प्रस्तावाला विरोध आहे...

September 11, 2024 8:32 PM

views 35

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.  

September 8, 2024 8:20 PM

views 10

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. त्याची चाचणी करण्यात आली असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. रुग्णाची स्थिती सध्या स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेल्यांचं ट्रेसिंग सुरू असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. हा रुग्ण मंकीपॉक्सचा प्रसार सुरू असलेल्या देशातून प्रवास करून परतला होता.

September 8, 2024 8:01 PM

views 23

अबुधाबीचे युवराज अल नाहयान यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक

अबूधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहमद बिन झायेद अल नाहयान यांचं तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. युवराज नाहयान यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीचे अनेक मंत्री आणि उद्योगजगतातलं प्रतिनिधीमंडळ आहे. युवराज नाहयान उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंधांवर ते चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ते भेट घेतील आणि राजघाट इथं जाऊन महात्मा गांध...

September 8, 2024 11:38 AM

views 20

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच मेलोनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. इटलीमधील सेर्नोबिओ इथं आयोजित अँब्रोसेट्टी फोरमच्या बैठकीच्या पार्श्र्वभूमीवर मेलोनी यांची काल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी भेट झाली. य...

September 5, 2024 8:52 PM

views 21

भारताचे सिंगापूरसोबत ४ सामंजस्य करार

भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर भारताच्या पूर्वेकडे चला धोरणाच्या अनुषंगाने सिंगापूरबरोबर धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली. त्यानंतर प्रधानमंत्री भारताकडे रवाना झाले. सिंगापूरची भारतात सुमारे १६० अब्ज  डॉलर्सची गुंतवणूक असून...

September 5, 2024 1:32 PM

views 21

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची बैठक

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची सहावी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव, अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमंत्री, मेजर जनरल सलमान बिन अवध अल-हरबी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण कार्यांचा व्यापक आढावा घेतला. या चर्चेमध्ये संयुक्त सराव, तज्ञांची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योग सहकार्य यासह लष्करी सहकार्य, आदी विषयांचाही पैलूंचा समावेश क...

September 1, 2024 1:24 PM

views 13

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्य...

August 31, 2024 2:13 PM

views 1

भारतातील UPI ने जगातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकले

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून या वर्षीच्या एप्रिल ते जुलै मध्ये एक्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये वार्षिक ३७ टक्के वाढ होत आहे. ग्लोबल पेमेन्ट हब पेसिक्युअरने दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला ३ हजार ७२९ व्यवहार होतात.