September 26, 2024 8:38 PM

views 19

नवी दिल्लीत भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची ८ वी सल्लामसलत बैठक

भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची  ८ वी सल्लामसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली.  यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत-इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली.

September 22, 2024 8:23 PM

views 23

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

September 21, 2024 2:41 PM

views 21

भारत आणि ब्राझील यांनी ऊर्जा क्षेत्रातील विद्यमान सहयोग आणि द्विपक्षीय व्यापारातील परस्पर फायदेशीर संबंधांचा घेतला आढावा.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य आणि व्यापारातले परस्पर संबंध तसंच, जैवइंधन क्षेत्रातल्या भागीदारीविषयी आज चर्चा झाली. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री अलेक्झांड्रे सिल्वेरा यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात चर्चेविषयी माहिती देण्यात आली.

September 21, 2024 12:15 PM

views 33

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळली

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तर देताना सांगितलं की, अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की, भारतानं आजवर लष्करी आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीसंदर्भात आंतरराष्ट्रीय दायित्वांचं पालन अतिशय शुद्ध पद्धतीनं केलं आहे.

September 18, 2024 1:03 PM

views 14

उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी

भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या चर्चेच्या फेरीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सचिव जयदीप मुजुमदार यांनी तर उरुग्वेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उरुग्वेचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री निकोलस अल्बरटोनी यांनी केलं.

September 18, 2024 1:00 PM

views 24

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत बैठक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या असून यामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. या बैठकांमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व सह सचिव नागराज नायडू यांनी तर अमेरि...

September 18, 2024 12:43 PM

views 26

भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण कालं नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनिएला मरियाना सेजोनोव उपस्थित होत्या.  हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतिक आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. दोन्ही देशातल्या ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधाचा गौरव करण्यासाठी हे टपाल तिकीट योग माध्यम असल्याचंही ते म्हणाले.

September 17, 2024 10:50 AM

views 24

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. भारतीय संघानं काल दक्षिण कोरियावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतीय हॉकी संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ आज पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करेल.  

September 16, 2024 10:17 AM

views 20

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दक्षिण कोरियाशी सामना

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यफेरीत चीनच्या हुलुनबुर येथे आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. भारताने या स्पर्धेत चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1, कोरियाचा 3-1 आणि पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना चीनशी होणार आहे.

September 13, 2024 1:16 PM

views 21

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि  चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक वांग यी यांच्यात यावर सहमती झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध चांगले राहावेत यासाठी सीमाक्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेष...