November 3, 2025 8:50 PM November 3, 2025 8:50 PM

views 106

विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव

आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ५१ कोटी रुपयांचं रोख पारितोषक जाहीर केलं आहे.    विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मनापासून अभिनंदन. य...

November 3, 2025 9:57 AM November 3, 2025 9:57 AM

views 18

भारताने अफगाणिस्तानला विषाणूजन्य रोगांवरची १६ टनांहून अधिक वजनाची औषधे पाठवली

भारतानं अफगाणिस्तानला मलेरिया, डेंग्यू आणि लेशमॅनियासिस या विषाणूजन्य रोगांवरची 16 टनांपेक्षा जास्त वजनाची औषधं आणि रोगनिदान उपकरणं पाठवली आहेत. अफगाणिस्तानच्या मलेरिया आणि अन्य विषाणूजन्य रोग प्रतिबंध अभियानाला यामुळे पाठबळ मिळेल असं तालिबानचे प्रवक्ते शराफत झमान यांनी म्हटलं आहे. भारताचा अफगाणिस्तानच्या विकासाला असलेला पाठिंबा आणि दीर्घकालिन भागीदारी यामुळे अधोरेखित झाल्याचं त्यांनी नमूद केलं.  

November 1, 2025 3:25 PM November 1, 2025 3:25 PM

views 17

पाक-व्याप्त काश्मीरमधील दडपशाही थांबवावी, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या ताब्यातल्या काश्मीरच्या काही भागात मूलभूत हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना ठार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.   पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारताच्या भूभागातलं मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं...

November 1, 2025 3:10 PM November 1, 2025 3:10 PM

views 37

आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ४८ पदकांची कमाई

बहरीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.   या स्पर्धेत भारताच्या २२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं, प्रीतीस्मिता भोई हिनं भारोत्तोलनात ४४ किलो वजनी गटात विक्रम प्रस्थापित करुन पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं, तर मुष्टियुद्ध आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली.

October 31, 2025 7:03 PM October 31, 2025 7:03 PM

views 28

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र  भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यांच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असताना भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला. ...

October 31, 2025 8:33 PM October 31, 2025 8:33 PM

views 34

विकसित भारत साकारण्यासाठी संघटित होऊन स्वतःला समर्पित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी संघटित होऊन स्वतःला समर्पित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते. २०१४ पासून सरकारनं नक्षलवाद आणि माओवादावर निर्णायक आणि शक्तिशाली प्रहार केला आहे. २०१४ पूर्वी देशभरातले जवळपास शंभर जिल्हे माओवादी कारवायांनी प्रभावित होते, पण आज ही संख्या अकरापर्यंत खाली आली आहे. तर, फक्त तीन जि...

October 31, 2025 1:16 PM October 31, 2025 1:16 PM

views 45

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त त्यांना मान्यवरांची आदरांजली

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल हे महान देशभक्त आणि दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माता होते. त्यांनी आपल्या अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वादनं राष्ट्राला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केलं, अशाशब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मुर्मू  यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या पटेल चौकात पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.   सरदार पटेल यांच...

October 20, 2025 12:55 PM October 20, 2025 12:55 PM

views 50

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य होतं. ते त्यांनी २२व्या षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळं तीन सामन्यांच्य...

October 18, 2025 5:34 PM October 18, 2025 5:34 PM

views 51

BWF जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत

गुवाहाटी इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं आज अंतिम फेरीत धडक मारली. तिनं चीनच्या लिऊ सी या हिच्यावर १५-११, १५-९ अशी सहज मात केली. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती अवघी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

October 16, 2025 8:25 PM October 16, 2025 8:25 PM

views 29

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारताचं लक्ष

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना मदत करतो, आपल्या अपयशाचं खापर शेजारी देशांवर फोडणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचं जयस्वाल म्हणाले. अफगाणीस्तान स्वतंत्रपणे काम करत असल्याने पाकिस्तानची चिडचिड होत असून भारत अफगणीस्तानचं सार्वभौमत्व जपण्यासाठी वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले.