October 1, 2024 12:37 PM October 1, 2024 12:37 PM

views 9

कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर ५२ धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या कानपूर क्रिकेट कसोटीमध्ये आजच्या अखेरच्या दिवशी बांग्लादेशचा संघ आपला दुसरा डाव २ बाद २६ धावांच्या पुढे सुरू करेल. भारताच्या आर अश्विननं हे दोन्ही गडी बाद केले. तत्पूर्वी; दोन दिवसांनंतर काल खेळ पुन्हा सुरू झाल्यावर बांग्लादेशनं १०७ धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला आणि सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतानं ९ गडी बाद २८५ धावांवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळाली आहे.

September 30, 2024 9:01 AM September 30, 2024 9:01 AM

views 8

जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अँड्रयू होलनेस चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

जमैकाचे प्रधानमंत्री डॉक्टर अँड्रयू होलनेस आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जमैकाच्या प्रधानमंत्र्यांचा द्विपक्षीय स्तरावरील हा पहिलाच भारत दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे समपदस्थ यांच्या विविध मुद्यांवरील बैठकीच्या निमित्ताने यापुर्वी अनेकदा भेटी झाल्या आहेत. जमैकाचे प्रधानमंत्री या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तसंच विविध क्षेत्रातील व्यापार आणि औद्योगिक प्रतिनिधींबरोबर बैठकीत सहभागी होतील. द्विपक्षीय संबंधांना ...

September 26, 2024 8:42 PM September 26, 2024 8:42 PM

views 11

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. आज सकाळी न्युयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेच्या ७९ व्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं, की भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे स्थायी सदस्य असले पाहिजेत. त्याबरोबरच आफ्रिकेतल्या दोन देशांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सुरक्षा समिती अधिक प्रभावी आणि प्रातिनिधीक करण्यासाठी तिच्या सध्याच्या रचनेत सुधारणा करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाल...

September 26, 2024 8:38 PM September 26, 2024 8:38 PM

views 9

नवी दिल्लीत भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची ८ वी सल्लामसलत बैठक

भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची  ८ वी सल्लामसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली.  यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत-इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली.

September 22, 2024 8:23 PM September 22, 2024 8:23 PM

views 6

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

September 21, 2024 2:41 PM September 21, 2024 2:41 PM

views 10

भारत आणि ब्राझील यांनी ऊर्जा क्षेत्रातील विद्यमान सहयोग आणि द्विपक्षीय व्यापारातील परस्पर फायदेशीर संबंधांचा घेतला आढावा.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य आणि व्यापारातले परस्पर संबंध तसंच, जैवइंधन क्षेत्रातल्या भागीदारीविषयी आज चर्चा झाली. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री अलेक्झांड्रे सिल्वेरा यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात चर्चेविषयी माहिती देण्यात आली.

September 21, 2024 12:15 PM September 21, 2024 12:15 PM

views 19

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळली

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तर देताना सांगितलं की, अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की, भारतानं आजवर लष्करी आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीसंदर्भात आंतरराष्ट्रीय दायित्वांचं पालन अतिशय शुद्ध पद्धतीनं केलं आहे.

September 18, 2024 1:03 PM September 18, 2024 1:03 PM

views 6

उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी

भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या चर्चेच्या फेरीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सचिव जयदीप मुजुमदार यांनी तर उरुग्वेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उरुग्वेचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री निकोलस अल्बरटोनी यांनी केलं.

September 18, 2024 1:00 PM September 18, 2024 1:00 PM

views 12

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत बैठक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या असून यामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. या बैठकांमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व सह सचिव नागराज नायडू यांनी तर अमेरि...

September 18, 2024 12:43 PM September 18, 2024 12:43 PM

views 11

भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण कालं नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनिएला मरियाना सेजोनोव उपस्थित होत्या.  हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतिक आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. दोन्ही देशातल्या ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधाचा गौरव करण्यासाठी हे टपाल तिकीट योग माध्यम असल्याचंही ते म्हणाले.