October 9, 2024 2:45 PM October 9, 2024 2:45 PM

views 19

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होणार

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होईल. तर किरण जॉर्ज आज पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या वांग त्झू वेईशी लढत देईल. महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत कॅनडाच्या मिशेल लीक कडून पराभूत झाली. दरम्यन, भारताच्या आकर्षी कश्यप आणि मालविका बनसोड यांनी सोळाव्या फेरीत प्रवेश केला आहे.  

October 9, 2024 1:41 PM October 9, 2024 1:41 PM

views 14

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. कझाकस्तानात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने काल उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाचा ३विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. पुरुष गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताची लढत कझाकस्तानशी होईल.

October 8, 2024 10:53 AM October 8, 2024 10:53 AM

views 16

भारताकडून मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

भारताने मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत आणि पूर्वनिर्धारित अटी आणि शर्तींसह परस्परांचं 3 हजार कोटी रुपयांचं चलन अदलाबदल करण्याला काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मालदीवसमोरील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर दोन करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली तसंच यापुर...

October 7, 2024 7:41 PM October 7, 2024 7:41 PM

views 16

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची पैसे हस्तांतरण यंत्रणा जोडण्याचे प्रयत्न

भारताची UPI आणि संयुक्त अरब अमिरातीची AANI पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या ३० लाख भारतीयांना सहजपणे भारतात पैसे पाठवता येतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारत आणि UAE उच्च स्तरीय संयुक्त कृती दलाच्या १२ व्या बैठकीनंतर मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. UAE नं भारतात फूडपार्क स्थापन करायची तयारी दाखवली आहे. यात येत्या २-अडीच वर्षात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळं ...

October 6, 2024 1:02 PM October 6, 2024 1:02 PM

views 6

मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू आजपासून  पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरदेखील ते चर्चा करणार आहेत. मुईज्जू या दौऱ्यात बेंगळुरू आणि मुंबई इथं विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

October 5, 2024 10:12 AM October 5, 2024 10:12 AM

views 14

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला

दुबईतल्या शारजा इथे सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तर ब गटात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

October 1, 2024 8:13 PM October 1, 2024 8:13 PM

views 16

भारत आणि जमैका यांच्यात ४ सामंजस्य करार

डिजिटल पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि क्रीडा क्षेत्रात भारत आणि जमैका यांच्यात आज ४ सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ. अंड्र्यू होलनेस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी झाली. जमैकाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. विविध क्षेत्रांमधले भारताचे अनुभव जमैकाला द्यायला तयार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. जमैकन सैन्यालाही भारत प्रशिक्षण देणार आहे. गुन्हेगारी, अंमली पदार्थांची वाहतूक, दहशतवाद ही दोन्ही देशा...

October 1, 2024 3:52 PM October 1, 2024 3:52 PM

views 9

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला. जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या ५१ आणि विराट कोहलीच्या नाबाद २९ धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला.

October 1, 2024 2:10 PM October 1, 2024 2:10 PM

views 4

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला ५ सुवर्णपदकांची कमाई

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पार्थ राकेश माने याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. पेरू इथल्या लिमामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अजय मलिक आणि अभिनव शॉ या जोडीनेही १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक पटकावलं. तर याच स्पर्धेच्या महिलांच्या ज्युनियर गटात गौतमी भानोत, शांभवी क्षीरसागर आणि अनुष्का ठाकूर यांनी १० मीटर एअर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत...

October 1, 2024 12:37 PM October 1, 2024 12:37 PM

views 9

कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर ५२ धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या कानपूर क्रिकेट कसोटीमध्ये आजच्या अखेरच्या दिवशी बांग्लादेशचा संघ आपला दुसरा डाव २ बाद २६ धावांच्या पुढे सुरू करेल. भारताच्या आर अश्विननं हे दोन्ही गडी बाद केले. तत्पूर्वी; दोन दिवसांनंतर काल खेळ पुन्हा सुरू झाल्यावर बांग्लादेशनं १०७ धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला आणि सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतानं ९ गडी बाद २८५ धावांवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळाली आहे.