October 21, 2024 8:50 AM October 21, 2024 8:50 AM

views 9

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडचा भारतावर ८ गडी राखून विजय

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडनं काल भारताचा आठ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी दिलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 24 तारखेपासून पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळला जाईल.

October 20, 2024 10:24 AM October 20, 2024 10:24 AM

views 10

कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या केवळ एका धावेनं हुकलेल्या शतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. त्याआधी न्यूझीलंडनं 402 धावा केल्या होत्या. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जागतिक कसोटी क्र...

October 20, 2024 9:44 AM October 20, 2024 9:44 AM

views 20

रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानी

भारत -रशिया यांच्यातील व्यावसायिक संबंध बळकट करण्याच्यादृष्टीनं मॉस्कोतल्या भारतीय दूतावासानं रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानीचं आयोजन केलं. यावेळी भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशांतील 80 हून अधिक अग्रणी उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूकीच्या क्षमता तसंच धोरणात्मक भागीदारीच्या शक्यतांविषयी चर्चा केली

October 20, 2024 1:44 PM October 20, 2024 1:44 PM

views 21

हॉकी : जोहोर सुलतान विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा जपानवर ४-२ असा विजय

हॉकीमध्ये भारताच्या कनिष्ठ पुरुष संघानं जोहोर सुलतान २०२४ विश्वकरंडक स्पर्धेत जपानच्या संघाचा ४-२ असा पराभव केला. मलेशियातील तमन दाया हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. आमीर अली, गुरज्योतसिंग, आनंद सौरभ कुशवाहा आणि अंकित पाल यांनी भारतासाठी गोल केले. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश या संघाचा प्रशिक्षक आहे. भारतीय संघाचा सामना आज दुपारी ब्रिटनच्या संघाशी होत आहे.

October 19, 2024 8:36 PM October 19, 2024 8:36 PM

views 12

न्यूझिलंड विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ ४६२ धावांवर तंबूत

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या आजच्या दिवसअखेर भारताचा संघ ४६२ धावांवर सर्वबाद झाला. सध्या भारताकडे १०६ धावांची आघाडी आहे. भारताच्या सरफराज खाननं दीडशे धावा झळकवल्या, तर रिषभ पंतचं शतक थोडक्यात हुकलं. सध्या भारताचा संघ कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे.

October 18, 2024 9:11 AM October 18, 2024 9:11 AM

views 12

बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी

बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.

October 16, 2024 3:38 PM October 16, 2024 3:38 PM

views 9

‘भारत’ खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं मंत्री पियूष गोयल यांचं प्रतिपादन

खेळणी तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे घटक उपलब्ध करून देणारी परिसंस्था भारताने तयार केली असून भारत हा आता खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं पहिल्या इंडियन फाऊंडेशन क्वालिटी मॅनेजमेंट परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘विकसित भारत २०४७ साठी राष्ट्रीय गुणवत्ता चळवळीचं शासन’ या विषयावर गोयल बोलत होते. देशात एक मजबूत गुणवत्तापूर्ण परिसंस्था तयार करण्यासाठी सरकार झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट या सूत्रानुसार काम करत आहे, असं गोयल ...

October 15, 2024 2:38 PM October 15, 2024 2:38 PM

views 14

भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे भारताचे आदेश

भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे आदेश भारतानं दिले आहे. त्यात प्रभारी उच्चायुक्त स्ट्युअर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रीक हेबर्ट याशिवाय इतर ४ अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश भारतानं दिले आहेत. या सर्वांना शनिवारपर्यंत भारत सोडून जायला सांगितलं आहे. याशिवाय भारतानं कॅनडातील आपल्या उच्चायुक्तांसह अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांनाही माघारी बोलावलं आहे. कॅनडातलं विद्यमान सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची बांधिलकी पाळेल याची खात्री नसल्यानं त्यांना मा...

October 13, 2024 3:02 PM October 13, 2024 3:02 PM

views 6

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे.

October 10, 2024 9:00 AM October 10, 2024 9:00 AM

views 14

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं 86 धावांनी जिंकला

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ वीस षटकांत 9 बाद 135 धावा करु शकला. उभय संघांचा तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे.