November 7, 2024 8:03 PM November 7, 2024 8:03 PM

views 7

भारत-अमेरिकेची भागीदारी विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिकेची भागीदारी बहुआयामी आणि विशेष असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला असून, भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत उत्सुक आहे, असं सांगितल्याचं ते यावेळी म्हणाले.  भारत आणि अमेरिका लोकांच्या कल्याणासाठी तसंच  शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करतील असं जैस्वाल ...

November 6, 2024 8:19 PM November 6, 2024 8:19 PM

views 8

भारत-अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी नवी दिल्लीत पार

भारत - अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी आज नवी दिल्लीत पार पडली. यात क्षमता उभारणी, प्रशिक्षणाचे आदानप्रदान, संरक्षण आणि उद्योग जगतातले सहकार्य आणि संयुक्त सराव अशा अनेक विषयावर या दोन दिवसीय बैठकीत चर्चा झाली. यात भारताच्या वतीनं  लेफ्टनंट जनरल जे.पी. म्यॅथ्यू आणि अमेरिकेच्या वतीनं लेफ्टनंट जनरल जोशुआ रूड यांनी संयुक्तपणे अध्यक्षस्थान स्वीकारलं. भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रात सैनिकी सहकार्य असायला हवं यावर दोघांचंही एकमत झालं.

November 4, 2024 8:29 PM November 4, 2024 8:29 PM

views 7

कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताकडून निषेध

कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. कॅनडामधल्या  भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने  तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडा सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान व्हँकुव्हर आणि सरे इथंही २ आणि ३ नोव्हेंबरला अ...

November 4, 2024 1:50 PM November 4, 2024 1:50 PM

views 8

भारतातील क्षयरोग रुग्ण संख्येत 17 टक्क्यांची घट

भारताने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत देशातील क्षयरोगाचं प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.   'क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.' असं प्रधानमंत्र्यांनी समाजमध्यमांवरील संदेशांत म्हंटलं आहे.

October 28, 2024 9:44 AM October 28, 2024 9:44 AM

views 6

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून अठरा वर्षानंतर स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा होत आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्पेनच्या पंतप्रधानांबरोबर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे देखील स्पेनच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री सांचेझ मुंबईलाही भेट देणार असून तिथं ते व्यापार, उद्योग, विचारवंत आणि चित्रपट उद्योगातील प्रमुखांशी संवाद साध...

October 24, 2024 8:18 PM October 24, 2024 8:18 PM

views 7

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं गमावली

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं आज गमावली. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या दुसऱा सामन्यात भारतानं ५-३ असा विजय मिळवला. कालचा सामना भारतानं गमावल्यानं दोन्ही देश १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळं मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. त्यात भारतीय खेळाडूंना केवळ १ गोल करता आला, जर्मनीनं ३ गोल केले.

October 24, 2024 7:32 PM October 24, 2024 7:32 PM

views 20

पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ २५९ धावात गारद / दिवसअखेर भारताच्या १ बाद १६ धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसअखेर भारतानं १ बाद १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिल १० आणि यशस्वी जयस्वाल ६ धावांवर खेळत होते. त्यापू्र्वी न्यूझीलंडच्या संघाने सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेने ७६ तर रचिन रवींद्रने ६५ धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ५ तर रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद केले. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं बंगळुरू इथला पहिला कसोटी सामना जिंकला आहे.

October 24, 2024 2:34 PM October 24, 2024 2:34 PM

views 10

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्य...

October 21, 2024 8:54 PM October 21, 2024 8:54 PM

views 16

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे २०२०मध्ये सुरू झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळू शकतो, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले. तसंच, रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्री यांनी माहिती दिली. रशियातून ८५ भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास २० जण अजूनही तिथेच...

October 21, 2024 4:53 PM October 21, 2024 4:53 PM

views 10

रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्सुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातल्या कझानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.    दरम्यान, रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय, विशेषतः विद्यार्थी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.   आकाशवाणीच्या बातमीदारानं विद्यार्थिनीशी साधलेला संवाद.    [video width="848" height="478" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-con...